लोणावळा, ता. ८ : हिंदकेसरी ‘लक्ष्या’ बैलाच्या वाढदिवसानिमित्त मावळातील वेहरगाव येथे बैलगाडा छकडी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत शिवाजीराव टाकवे, सचिन निलख यांच्या ‘माऊली-हरण्या’ या बैलजोडीने ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताब पटकावला.
स्पर्धेला परिसरातील शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीचे शौकीन उपस्थित होते. स्पर्धेसाठी १६ सेकंदांची धावपट्टी ठेवण्यात आली होती. या अंतरावर माऊली-हरण्या या बैलजोडीने अवघ्या १४.८८ सेकंदांत सर्वांना थक्क करत धाव पूर्ण करून विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वप्निल तरस, दत्ता कुटे यांच्या बैलजोडीने १५.०३ सेकंदांचा वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला. संपूर्ण स्पर्धेत बैलजोड्यांची वेगवान धाव, शेतकऱ्यांचा उत्साह आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे वातावरणात चांगलीच रंगत पाहायला मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.