पुणे

घरफोडीतील १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

CD

टुडे एकसाठी
घरफोडीतील १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर, ता. ८ ः सांगवी (ता. श्रीगोंदे) येथे भरदिवसा बंद घर फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून १६ लाख ५९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सतीश उत्तमराव भोईटे (रा. सांगवी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील सुमारे पाच लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते. भोईटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, तसेच अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, मनोज साखरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, सोनल भागवत यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. पथकाने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा नितीन दत्तात्रय जाधव (वय ४०, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड, हल्ली रा. हनुमाननगर, दौंड रस्ता, अहिल्यानगर) याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेले काही दागिने स्वतःच्या राहत्या घरात लपवून ठेवले होते, तर काही दागिने सराफ व्यावसायिकाला विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी १४८ ग्रॅमचे दागिने हस्तगत केले. नितीन जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात बारामती, इंदापूर, यवत, पंढरपूर, तसेच गेवराई पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Pune Airport Security : वाढत्या बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हान वाढले; ना-हरकत प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

हिमालमध्ये खासगी बसचा अपघात नेमका कसा झाला? ८ प्रवाशांनी गमावले प्राण; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

E-20 Petrol: ई-२० पेट्रोलचा वाहनांवर परिणाम? मायलेज कमी झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ; तज्ज्ञांचे म्हणणे काय?

मला स्पष्ट सांगण्यात आलेलं की... 'दामिनी' मधला अत्याचाराचा सीन करताना अशी झालेली प्राजक्ता दिघे यांची अवस्था

SCROLL FOR NEXT