पुणे

चऱ्होली घरफोडी प्रकरणातील आरोपीला कारावासाची शिक्षा

CD

पाईट, ता. २१ : चऱ्होली बुद्रुक (ता. खेड) येथील घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगार हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. घोटावडे फाटा, ता. मुळशी) याला राजगुरुनगर न्यायालयाने तीन वर्षे साधा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
फिर्यादी कल्पना पारख या डिसेंबर २०२३ मध्ये लग्नकार्यासाठी बाहेर गेल्या असताना चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजय लोहकरे व पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.
राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. उतकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ए. एस. चव्हाण यांनी चार साक्षीदार तपासले. हर्षद पवार याचा इतर चार गुन्ह्यांतही सहभाग असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने त्याला भादवि कलम ४५४ अन्वये दोषी धरून शिक्षा ठोठावली. या कामात पोलिस हवालदार आर. एस. मोहिते आणि योगिता गावडे यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT