crime sakal
पुणे

Pune Crime : भिक्षेच्या बहाण्याने घरफोड्या, चोरट्यांकडून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

भीक मागण्याच्या बहाण्याने घरातून दागिने चोरणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भीक मागण्याच्या बहाण्याने घरातून दागिने चोरणाऱ्या महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली. महिलेसह तिच्या अल्पवयीन साथीदाराकडून ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड आणि मोटार जप्त केली आहे.

मिली दीपक पवार (वय २०, रा. आडगाव नाका, पंचवटी, जि. नाशिक) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत होते. तीन महिन्यांपूर्वी दागिने आणि रोकड चोरीच्या घटनेतील महिला आणि अन्य एकजण आळंदी देवाची परिसरात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर आणि हवालदार महेश नाणेकर यांना मिळाली.

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना चंदननगर पोलिस ठाण्यात आणून अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आणि रोकड आढळली. चौकशीदरम्यान, आरोपींनी ते भीक मागण्याच्या बहाण्याने नजर चुकवून घरात प्रवेश करून चोरी करीत असत. १८ ऑगस्ट रोजी टिंबर मार्केटमधील एका घरातून चोरी केल्याचे सांगितले.

याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, तीन महिन्यांपूर्वी चंदननगर परिसरात एका घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ३५ लाख रुपयांचे ५२ तोळे सोन्याचे दागिने, २६ हजारांची रोकड आणि चारचाकी गाडी असा ४० लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलिस कर्मचारी महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शीतल वानखेडे, पूजा डहाळे, मनीषा पवार आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT