घरफोडी sakal
पुणे

पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

शहरातील घरफोड्यांच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरातील घरफोड्यांच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. दोन दिवसांत सुतारवाडी व शिवणे परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या असून त्यामध्ये साडे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सुतारवाडी येथील घटनेप्रकरणी ३१ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या सुतारवाडी येथील आनंदनिवास सोसायटीमध्ये राहतात. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर बेडरूमच्या कपाटातून २६ हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी सायंकाळी साडे पाच वाजता घरी परतल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत. शिवणे येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेबाबत तुषार बनकर (वय ३०) यांनी वारजे माळवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

तर चेतन ज्ञानेश्वर गरुड (वय २१, रा. दांगट इस्टेट, शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बनकर हे शिवण्यातील समर्थ रेसिडेन्सी येथे राहतात. ते १६ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सदनिकेला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून लाकडी तिजोरीतील एक लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

Banana Halwa Recipe: उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग केळं, गूळ अन् ३ पिठांपासून बनवा भन्नाट ‘केळ्याचा हलवा’

आई-वडिलांच्या घरात राहून त्यांचाच छळ करता? मुलगा-सुनेला घराबाहेर काढण्याचा अधिकार पालकांना; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा

कृषी विभागाचा मोठा निर्णय! आता गावागावांत १५०० रुपये मानधनावरील शेतकरी मित्र; ३० टक्के पदे महिलांसाठी राखीव; राज्यात ११,५८७ शेतकरी मित्र नेमले जाणार

SCROLL FOR NEXT