पुणे

शनिवारपासून रांजणगावला बससेवा होणार सुरु

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : येत्या शनिवार (ता. १२) पासून वाघोली ते रांजणगाव गणपती अशी १६१ क्रमांकाने पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु होणार आहे. या संदर्भात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या उपनगरात औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच या उपनगरांमध्ये पर्यटन स्थळे व तीर्थक्षेत्रे असल्याने परिवहन महामंडळाचीे बस सेवा सुरू करणे बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, नोकरदार, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आदींनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. संचालक मंडळाने पीएमआरडीए च्या हद्दीपर्यंत बस सेवा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार १२ डिसेंबर पासून बारा मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये चाकण ते शिक्रापूर या बस मार्गाचाही समावेश आहे.

वाघोली ते रांजणगाव या मार्गावर तीस मिनिटाला दहा बस धावणार आहेत. रांजणगाव गणपती येथे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र व पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्याने या बससेवेला विशेष महत्त्व येणार आहे. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे महानगर प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, "रांजणगाव पर्यंत बस सेवा सुरु होण्यासाठी पुणे महानगरपालीकेकडे सतत मागणी केली होती, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बस सेवेला अखेर यश मिळाले असल्याचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले. रांजणगाव गणपती हे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र असून एमआयडीसी मुळे कामगारांनाही या बस सेवेचा लाभ होणार असल्याचे श्री पाचुंदकर यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT