Katraj_Fire 
पुणे

कात्रज घाटातील वणवा आटोक्यात; अग्निशमन दलाची मोठी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

कात्रज (पुणे) : कात्रज घाटात वणवा लागल्याची घटना मंगळवारी (ता. १६) घडली. ही आग भिलारेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वनक्षेत्रालगत असणाऱ्या खाजगी मालकी क्षेत्रात लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, अशी माहिती कात्रज विभागाच्या वनरक्षक स्वाती खेडकर यांनी दिली आहे.

साधारणतः ४ ते ५ एकर क्षेत्रात ही आग लागली होती. या आगीमध्ये कुठलेही नुकसान झालेले नाही. अग्निशामक दलाच्या गाड्या डोंगराच्या पायथ्याशी थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अग्निशामक दलाच्या आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. आग कशामुळे लागली, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

दरम्यान, कात्रज घाटात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच कात्रज घाटात शिंदेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आग लागली होती. शिंदेवाडीच्या अगोदर 'हॉटेल चुल मटण' रस्त्यासमोर चार-पाच किलोमीटरपर्यंत डोंगराला आग लागली होती. या आगीत डोंगरावर असणारे लहान-मोठे प्राणी, पक्षी हे नष्ट झाल्याची शक्यता वर्तिविण्यात आली होती. कात्रज घाटातील डोंगरावर अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडत असल्याने आता पर्यावरण प्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT