पुणे

मायणीत व्यावसायिकांची एकजूटीसाठी बैठक

CD

मायणीत व्यावसायिकांची एकजुटीसाठी बैठक

पार्किंग, कॅमेरे, वाहतूक कोंडीसाठी पुढाकार; नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

मायणी, ता. १६ : येथील व्यापारी व व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत विविध क्षेत्रातील सुमारे अडीचशे व्यापारी, व्यावसायिकांनी हजेरी लावली. यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली.
येथील श्री धनगर विठोबा मंगल कार्यालयात ही बैठक झाली. खटाव तालुक्यातील येथे बाजारपेठ असल्याने व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुण व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, युवा उद्योजक, गलाई बांधव, कापड उद्योजक आदी व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात गावातील मुख्य रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सम-विषम पार्किंग नियोजन, परिवहन मंडळाची बस स्थानक येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन देणे, ग्रामपंचायत व पोलिस विभागाशी चर्चा करून आठवडा बाजारादिवशी बसस्थानकातील वाहनांची कोंडी कमी करणे, गटारावरील झालेली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेणे, चांदणी चौकातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे.
वारंवार खंडित होत असलेल्या विजेमुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून, त्याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देणे, गावातील एकमेव राष्ट्रीयीकृत असल्याने व्यवहार करताना व्यावसायिकांना अडचणी येत आहेत, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा झाली. गावात होत असलेल्या चोरीबाबत सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने सर्वासोबत राहण्याचा निर्णय यावेळी घेतला.
...........
कोट :
...........

दरम्यान बैठकीनंतर गावातून मायणी व्यापारी-व्यावसायिक संघटनेने सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चांदणी चौकातील व गावातील मार्केटला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.


B03439
मायणी : बैठकीसाठी जमलेले व्यावसायिक. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT