Businessman Filed case against police for seizing buck  Sanil Gadekar
पुणे

ऐकावं ते नवलंच! बोकडासाठी व्यावसायिक कोर्टात; पोलिसांविरोधातच दाखल केला दावा

बळी देण्यासाठी नेण्यात येणार होते बोकड, न्यायालयाने तुर्तास ताबा नाकारला

सनिल गाडेकर

पुणे : बळी देण्यासाठी नेण्यात येत असलेले दोन बोकड विश्रांतवाडी पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यामुळे त्यांचा ताबा मिळावा म्हणून बोकडांच्या मालकाने न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत एका सामाजिक संस्थेकडे बोकडांचा ताबा सोपवला आहे. ज्या व्यक्तीने हे बोकड विकत घेतले त्याकडे त्यांच्या खरेदी-विक्रीचा परवाना नाही. तसेच बोकडांचा वापर नेमका कशासाठी करण्यात येणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. सोनावणे यांनी हा निकाल दिला.

‘पीपल फॉर ॲनिमल’ (पीएफए) या सामाजिक संस्थेच्या सुनीता आयलानी-पमनानी या मुलगा राधेय यांच्यासह टिंगरेनगरमधील आदर्श कॉलनीमधून जात होत्या. तेव्हा त्यांना दोन मुले संबंधित बोकडांबरोबर फिरताना दिसले. त्यामुळे पमनानी यांनी त्या मुलांकडे चौकशी केल्यानंतर बोकड्यांचा बळी देण्यात येणार असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी त्वरित ही माहिती पशू संवर्धन कार्यालयास दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तेथे जाऊन दोन्ही बोकड ताब्यात घेतले. हे दो

दोन्ही बोकड टिंगरेनगर येथील एका ३० वर्षीय व्यावसायिकाचे आहेत. त्यांचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात अर्ज केला होता. धार्मिक कार्यक्रम असल्याने चाकण येथून बोडके विकत घेतले होते. त्यांना रहिवासी भागात कापण्यात येणार नव्हते. बोकडांचा ताबा देताना न्यायालयाने दिलेल्या अटी-शर्ती पाळण्यात येतील. बोकडे जप्त केल्याने माझे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बोकडे पुन्हा मिळावेत, असा अर्ज व्यवसायिकाने न्यायालयात केला होता. पीपल फॉर ॲनिमल’ या सामाजिक संस्थेकडे दोन्ही बोकडांचा तात्पुरता ताबा देण्यात आला आहे.

दर तीन महिन्यांची बोकड्यांची तपासणी करा :

या दोन्ही बोकडांची किंमत १८ हजार रुपये आहे. ते जप्त करीत असताना त्यांची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत ‘पीएफए’ने जनावरांच्या शासकीय डॉक्टरकडून दर तीन महिन्यांनी तपासणी करून घ्यावी. तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.

- सुनीता आयलानी-पमनानी, क्रुएल्टी केस आॅफीसर, पीपल फॉर ॲनिमल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT