court sakal
पुणे

पुणे : उद्योजक गणेश गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळला

आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी औंध येथील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून पत्नीचा छळ केल्याप्रकरणी औंध येथील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. नेमसे यांनी हा आदेश दिला.

या प्रकरणी नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (वय ६०), सोनाली दीपक गवारे (वय ४०), दीपक निवृत्ती गवारे (वय ४५ दोघेही रा. जंगली महाराज रस्ता), दीपाली वीरेंद्र पवार (वय ३८), भागीरथी इरप्पा उकली (पाटील) (वय ५०, दोघेही रा. औंध), राजू अंकुश (रा. सांगवी) आणि रघुनाथ राजाराम येंमुल (वय ४८, रा. बाणेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. गणेश गायकवाड याच्या पत्नीने याबाबत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात गणेश गायकवाड याला २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी जामिनाला विरोध केला.

अर्जदार आरोपीने फिर्यादी यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा गुन्हा जादूटोणा कायद्यासंबंधी आहे. फिर्यादी यांचे स्त्रीधन आरोपीने लपवून ठेवले आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. मुरळीकर यांनी केला. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. सुधीर शहा आणि ॲड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दादा गायकवाड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्हांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

SCROLL FOR NEXT