Businessman kidnapped for not paying money lost in IPL betting pune crime police sakal
पुणे

Pune Crime : आयपीएल सट्ट्यात हरलेले पैसे न दिल्याने व्यावसायिकाचे अपहरण; दोघांना अटक

आरोपींनी शनिवारी पहाटे महिलेच्या पतीचे मोटारीतून अपहरण केले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आयपीएलमध्ये सट्ट्यात हरलेले सहा लाख रुपये न दिल्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी सट्टेबाजांनी एका व्यावसायिकाचे पुण्यातून अपहरण करून मारहाण केली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी वाघोली येथील आव्हाळवाडी परिसरात घडला.

नागेश एलमल्ली, आकाश बिराजदार (रा. सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आव्हाळवाडी येथील एका महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे ऑटो गॅरेज आहे. पतीने आयपीएल सट्ट्यात सहा लाख रुपये हरले होते. परंतु त्याने ही रक्कम सट्टेबाजांना दिली नव्हती. ही रक्कम वसूल करण्यासाठी आरोपी त्याच्या मागे लागले होते.

आरोपींनी शनिवारी पहाटे महिलेच्या पतीचे मोटारीतून अपहरण केले. हरलेले सहा लाख रुपयांचे १० लाख रुपये मिळणार नाहीत, तोपर्यंत सोडणार नसल्याचे सांगत पतीला घरात डांबून मारहाण केली. याबाबत महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान आरोपी हे महिलेच्या पतीला सोलापूरला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी तातडीने सोलापूरला जाऊन महिलेच्या पतीची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT