gobi. 
पुणे

जीवाचं पाणी करुन पीक घेतलं, पण दर मिळाला 2 रुपये किलो; शेतकऱ्याची व्यथा

नवनाथ भेके

निरगुडसर- रात्रंदिवस कष्ट करुन पिकाला जपलं, लाखो रुपये खर्च केले. पण दोन ते अडीच रुपये किलो दर मिळाला तर आमचा कष्टाचा मोबदला जाऊ दया पण केलेला खर्च वसुल होणार कसा?चार एकर क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड केली, त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये भांडवली खर्च केला. पुढे चांगला बाजार भाव मिळून चांगले पैसे होतील अशी आसा होती, पण अशा बाजारभावामुळे आम्ही हतबल झालोत, अशी व्यथा आंबेगाव तालुक्यातील शेतकरी योगेश वाव्हळ व संतोष कोल्हे यांनी व्यक्त केलीये.  

शिंगवे-भागडी रस्त्यावर कोल्हे वस्तीवर योगेश वाव्हळ व संतोष कोल्हे यांनी चार एकर क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड केली. त्यासाठी साठ हजार प्रति रोप 85 पैसे दराने खरेदी केले. जमीन मशागत, रोपे,मजुरी, खते,औषधांसाठी अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला, पहील्या तोडयात १६ पिशव्या भाडयाच्या गाडीत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी पाठवल्या. परंतु प्रतिकिलो अडीच रुपये दर मिळाला, फ्लॅावरचे दर कोसळल्याने केलेला लाखो रुपये खर्च वसुल होणार तरी कसा असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर आहे.

डॉ. शीतल आमटे- करजगी यांचं शेवटचं चॅटिंग कुणाशी? पासवर्ड स्वतःचे डोळे ठेवल्यानं...

गेले दोन महिने दिवस-राञ एक करुन पिकाला पाणी दिले, मुलाप्रमाणे काळजी घेतली पिक आमचं सोन आहे. पण बाजारभाव नाही यामुळे मोठा फटका बसणार आहे. शनिवारी केलेला दुसरा तोडयाचा माल एक प्रकारे जुगार खेळुन मुंबईला विक्रीसाठी पाठवणार आहे, पाठवणीचा जर खर्च वसुल झाला नाही तर पदरमोड भाडे दयावे लागण्याची भीती आहे, असं  योगेश वाव्हळ म्हणाले.

रात्रपाळी करुन पिकाला पाणी दिले....

शेतकरी योगेश वाव्हळ म्हणाले की, लागवडीच्या वेळी फ्लॅावर पिकाला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये किलो दर मिळत होता. त्यामुळे आपले पिक जोमदार घेऊन चांगले उत्पादन घ्यायचे,चांगला दर मिळाला तर चांगले पैसे मिळतील ही आशा होती. त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला राञपाळी करुन पिकाला पाणी दिले आणि ऐन तोडयाला बाजारभाव अडीच रुपये किलो भाव मिळाला यामुळे मोठा फटका बसणार आहे. दोन महिन्यापुर्वी अशाच प्रकारे दोन एकरावर कोबी पिक घेतले अवघ्या १५ पिशव्या काढल्या आणि पिकात मेंढया सोडल्या त्यावेळी मोठे नुकसान सोसावे लागले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

Marathi News Live Updates : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT