Calender
Calender 
पुणे

सहावी ते आठवीसाठी आता एज्युकेशनल कॅलेंडर

सकाळवृत्तसेवा

शिक्षक, विद्यार्थी, पालकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शक
पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देताना शिक्षकांनी कसे शिकवावे, संदर्भ कसे द्यावेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी टप्प्या-टप्प्याने पाठ समजून घेताना नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारी शैक्षणिक दिनदर्शिका राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) प्रसिद्ध केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सहावी ते आठवीकरिता असणारी ही शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केल्याची घोषणा ट्‌विटरद्वारे नुकतीच केली आहे. यापुर्वी त्यांनी चार आठवड्यांची दिनदर्शिका जाहीर केली होती. आता पुढील आठ आठवड्याची दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधितांसाठी काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ट्‌विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही दिनदर्शिका एनसीईआरटीच्या https://ncert.nic.in/alternative-academic-calendar.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये 

  • प्रत्येक आठवड्याचे नियोजन.
  • शिक्षकांनी संदर्भ पाहण्यासाठी मार्गदर्शन
  • विद्यार्थी, पालकांना अभ्यासाबाबत सूचना
  • अध्ययन आणि अध्यापन सुलभ व्हावे, याकरिता आवश्‍यक लिंक.
  • पाठ्यक्रम कसा शिकवावा, यांचे सर्वसाधारण वेळापत्रक, आखणी
  • शिक्षकांसाठी विषयानुसार पाठ्यक्रम शिकविण्याचे नियोजन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT