leopard-attack. Sakal
पुणे

पुणे : पिंपळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंढार, उंब्रज परिसरात बिबट्याचा वावर वाढला

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी - येथील तोतरबेट (ता.जुन्नर) शिवारातील शेतकरी बबन बाबुराव फुलसुंदर यांच्या नऊ महिन्याच्या कालवडीचा गुरुवारी (ता. २८) संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला. संध्याकाळची वेळ झाल्याने कालवडीला फुलसुंदर यांनी घराच्या शेजारीच बांधले होते. अचानक बाजुच्या शेतातून येऊन बिबट्याने तिच्यावर हल्ला करून जवळच असलेल्या मकाच्या शेतात नेले त्यात तिचा मृत्यु झाला. त्यावेळी तेथे दत्ता फुलसुंदर, प्रमोद शिंदे, आकाश फुलसुंदर, तुषार वाघुले, नवनात वाघुले, जगदीश खोकले हे गेले असता बिबट्याने तेथुन पळ काढला.

दत्ता फुलसुंदर यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली असून वनखात्याकडून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी. तसेच याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंढार, उंब्रज आदी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असुन संध्याकाळी सातच्या सुमारास उजेड असताना देखील बिबट्याने कालवडीला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT