पुणे

खाणीतील मृतांची संख्या शंभरच्या वर

CD

बांगुई, ता. २० (पीटीआय) : मध्य आफ्रिकेतील कॅमेरूनच्या सीमेजवळील झाम्बोये येथील सोन्याची खाण कोसळून शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये कोणी जिवंत सापडण्याची आशा गुरुवारी मावळत चालली आहे. बचाव पथकांकडून आणखी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली अजून किती जण अडकले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. खाणीत बचावकार्य सुरू असले तरी एवढ्या मोठ्या दुर्घटनेचा सामना करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि तज्ज्ञांची कमतरता असल्याचे स्थानिक कामगारांनी सांगितले.
‘‘बचावकार्य सुरू आहे; मात्र, एवढ्या मोठ्या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी ते पुरेसे नाही,’’ असे या खाणीत काम करणाऱ्या जेरेमी नग्बिरी यांनी सांगितले. या दुर्घटनेत त्यांचा भाऊ आणि एक मित्र मृत्युमुखी पडला. बचावकार्यादरम्यान काही जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे आपण पाहिल्याचेही त्यांनी सांगितले.
भूस्खलनामुळे दुर्घटना
मंगळवारी भूस्खलन झाल्यानंतर ही खाण कोसळली. स्थानिक अधिकारी आणि रेड क्रॉसने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. खाणमंत्री रुफिन बेनाम बेलतुंगू यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. तसेच, असुरक्षित पद्धतीने खाणकाम करण्याच्या धोक्यांबाबत खाण कामगारांना सावध केले, अशी माहिती मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT