पुणे

कॅनडातील गहू उत्पादनात १३ टक्के घट अपेक्षित

CD

कॅनडातील गहू उत्पादनात १३ टक्के घट अपेक्षित
--
‘यूएसडीए’चा अंदाज; उत्पादन ३.४६ कोटी टनांवर येण्याचा अंदाज
--

ओटावा (वृत्तसंस्था) : प्रतिकूल हवामानामुळे २०२६-२७ या विपणन वर्षात (ऑगस्ट-जुलै) कॅनडातील गहू उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) अंदाजानुसार, कॅनडाचे गहू उत्पादन ३.४६ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन सुमारे १३ टक्क्यांनी कमी असेल. उत्पादनातील या घटीचा जागतिक गहू व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पेरणी क्षेत्रातील घट आणि सरासरी उत्पादकता कमी राहण्याची शक्यता ही उत्पादन घटीमागील प्रमुख कारणे आहेत. कॅनडातील प्रमुख गहू उत्पादक प्रेअरी प्रांतांमध्ये अतिवृष्टी आणि दीर्घकाळ टिकलेल्या थंडीमुळे पेरणीला विलंब झाला. साधारणपणे मेअखेरीस पूर्ण होणारी पेरणी यंदा लांबली. त्यामुळे पिकाला दव आणि हंगामाच्या सुरुवातीलाच थंडीचा सामना करावा लागण्याचा धोका वाढल्याचे ‘यूएसडीए’च्या अहवालात म्हटले आहे.

२०२५-२६ या विपणन वर्षात कॅनडाची गहू निर्यात २.९९ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. मात्र २०२६-२७ मध्ये उत्पादन घटल्यास निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

कॅनडाच्या गव्हाच्या प्रमुख आयातदारांमध्ये इंडोनेशिया आणि चीनचा समावेश आहे. २०२५-२६ मध्ये कॅनडाच्या एकूण गहू निर्यातीमध्ये इंडोनेशियाचा वाटा १०.८७ टक्के, तर चीनचा वाटा १०.४१ टक्के होता.
--
चौकट
दबाव वाढण्याची शक्यता
कृषी निविष्ठांच्या वाढत्या खर्चाकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेषतः फॉस्फेट खतांच्या पुरवठ्यातील अनिश्‍चितता आणि वाढत्या खर्चामुळे कॅनडातील गहू उत्पादकांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Storage : 'कोयना' भरतंय, कृष्णेचाही वाढतोय विसर्ग..; धरण 88 टक्क्यांवर, 16 हजार 468 क्युसेक आवक, 13 हजार 894 क्युसेक विसर्ग

FDAला उच्च न्यायालयाने पुन्हा खडसावले, अ‍ॅमेझॉनच्या कारवाईवरून व्यक्त केला संताप

Karad Politics : नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण! 680 कोटींच्या 'नेकलेस रोड'वरून भाजप-सत्ताधाऱ्यांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, वाटेगावकरांचा पलटवार

Latest Marathi News Live Update : भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

आमच्या लग्नात अचानक राष्ट्रगीत वाजलं आणि नाचणाऱ्यांचे हात... मृणाल दुसानिसने सांगितली लग्नातली गंमत; म्हणते-

SCROLL FOR NEXT