पुणे

आनंदी लिनेस क्लबच्यावतीने कर्करोग जनजागृती शिबिर

CD

YSH26B05110
अकलूज (ता. माळशिरस) : आनंदी लिनेस क्लबतर्फे आयोजित शिबिरास उपस्थित मान्यवर.
---
आनंदी लिनेस क्लबतर्फे
कर्करोग जनजागृती शिबिर
सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता‌. ५ : येथील आनंदी लिनेस क्लबच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोग जनजागृती शिबिर राबविण्यात आले. या शिबिरास महिलांची उपस्थिती मोठी होती.
करोळे (ता. पंढरपूर) येथे आयोजित शिबिरात गर्भाशय व छातीच्या कर्करोगाबाबत डॉ. छाया दगडे यांनी मार्गदर्शन करून त्याची लक्षणे, त्यावर घ्यावयाची काळजी व त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट या संदर्भातील माहिती दिली‌.
यावेळी क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे व क्लबच्या अध्यक्षा राजश्री जगताप यांच्या सहकार्यामुळे ज्या गावात जायला रस्ताही नाही अशा अतिशय ग्रामीण भागात शिबिर घेण्यात आल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. यावेळी राजश्री जगताप यांनी सॅनिटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेचा संदेश दिला. छाया बुराडे यांनी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आनंदी लिनेस क्लब पुढील काळात वेगवेगळे उपक्रम राबवेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यामध्ये सरपंच नंदा शिंगटे व सविता शिंगटे तसेच आशा वर्कर साठे, परिचारिका शिरसाट यांनी सहकार्य करीत महिलांच्या कोणत्याही शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. राजश्री जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT