Pune News sakal
पुणे

Pune News : निकाल रखडल्याने सेटचे उमेदवार हवालदील

एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न; एक लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न

सम्राट कदम

पुणे ः पदव्युत्तर शिक्षणानानंतर निदान तासिका तत्त्वावर तरी शिकविता येईल, म्हणून मी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दिली होती. मात्र आज तीन महिन्यांनंतरही सेटचा निकाल रखडला असून, महाविद्यालयांची प्राध्यापक भरतीची अंतिम टप्प्यात आहे. यंदाचे वर्ष जर वाया गेले तर थेट पुढल्या वर्षापर्यंत नोकरीची वाट पाहावी लागेल. एक मुलगी म्हणून हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, अशी प्रतिक्रिया एमएस्सी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थिनीने सकाळशी बोलताना दिली.

सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे, याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मात्र, अजूनही या बद्दल कोणतीच हालचाल झाली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. शासन आणि विभागाच्या धोरण लकव्याचा थेट फटका एक लाख विद्यार्थ्यांना बसत असून, तातडीने निर्णय घेऊन निकाल जाहीर करणे गरजेचे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे. ७ एप्रिल २०२४ रोजी ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रमुख १७ शहरांमधील २९८ परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी यंदा एक लाख २८ हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख ९ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थिती होते. हे सर्व विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, निकाल कसा जाहीर करावा यावर शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले नाही.

परीक्षेचा निकाल जाहीर करताना एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे? याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाकडून आता सामान्य प्रशासन विभागाकडे हा विषय आहे. मार्गदर्शन मिळताच तातडीने निकाल जाहीर केला जाईल.

- डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT