Candidates oppose a single exam in agriculture, forestry, engineering, while experts welcome decision
Candidates oppose a single exam in agriculture, forestry, engineering, while experts welcome decision 
पुणे

कृषी, वन, अभियांत्रिकीची एकच परीक्षेस उमेदवारांचा विरोध तर तज्ज्ञांकडून स्वागत

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "राज्य शासनातील वन, कृषी आणि अभियांत्रिकी पदांच्या भरतीसाठी स्वंतत्रपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आता एकच पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधी कमी झाली अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली असली तरी, प्रशासकीय दृष्ट्या व परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

'एमपीएससी'ने शुक्रवारी 'महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा' या संयुक्त परीक्षेची घोषणा केली. २०२१ पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरोना व आरक्षणाच्या तिढ्यामुळे  राज्यसेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत. या परीक्षांबाबत घोषणा अपेक्षित असताना 'एमपीएससी'ने तांत्रिक संवर्गाची पदे भरण्यासाठी नव्या परीक्षेची पद्धत जाहीर केली. त्यामुळे त्याच्या नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सोशल मीडियावर बहुतांश विद्यार्थ्यांनी  'महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षे'स विरोध केला आहे. 


"आयोगाने एकत्र परीक्षा घेण्याचा निर्णय खुप लोकांना संभ्रमात टाकण्याचा आहे. एक तर तीन वेगळ्या शाखांचा अभ्यासक्रम खूपच भिन्न आहे, त्यामुळं या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असेल याचीच चिंता आहे जास्त," असे अभिजित गोसावी या विद्यार्थ्यांने सांगितले. 

महेश घरबुडे म्हणाला, "तीन परीक्षांऐवजी एकच परीक्षा घेतल्याने संधी कमी होईल. आयोगाचा हा विद्यार्थ्यांनवर अन्यायकारक आहे. अभ्यासक्रम काय असेल हे देखील विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड गोंधळून गेले आहेत."

Sakal Impact: अखेर शिंदे कुटुंबाला मिळाला न्याय; मंत्रालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत उडाली होती खळबळ​

"देशपातळीवर परीक्षांसह राज्यातील विविध  स्पर्धा परीक्षांमुळे रविवारी परीक्षा केंद्र उपलब्ध न होणे, विद्यार्थ्यांची एकाच दिवशी दोन परीक्षा येणे अशा कारणांनी आहे परीक्षांचे नियोजन अवघड होत आहे. तसेच प्रत्येक परीक्षेचे वेगळे शुल्क, त्यासाठीचा प्रवास खर्च वाचेल. याचा विचार करता संयुक्त परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य आहे."
- भूषण देशमुख, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

"वन, कृषी व अभियांत्रिकी सेवेची संयुक्त परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही मतप्रवाह असू शकतात.  संयुक्त परीक्षेमुळे वेळेची बचत होऊन लवकर निकालाची जाहीर होतील. तिन्ही विषय भिन्न असल्याने पूर्व परीक्षाचा अभ्यासक्रम समान असला पाहिजे."
- डॉ. सुशील बारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

अशी असेल तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
महसूल, वनविभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंधारण या विभागातील राजपत्रित गट अ व गट व गट ब या संवर्गातील पदे भरण्यासाठी आयोगाकडून वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा या तीन परीक्षा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र आता 'महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा' ही एकच परीक्षा घेतली जाईल.

Video : 'ऑनलाइन एज्युकेशन' आले लहान मुलांच्या डोळ्यावर!​

अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी अर्ज भरता येईल. त्यावरून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित होईल व या तिन्ही संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतली जाईल. 


यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षेला झाला होता विरोध
पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांसाठी २०१३ ते २०१७ पर्यंत स्वतंत्र परीक्षा होत होती, पण २०१७ पासून 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब' ही संयुक्त परीक्षा होत आहे. या परीक्षेसही त्यावेळी विरोध झाला होता. तसा यावेळी विरोध होत आहे. परीक्षनेनंतरच या निर्णय योग्य की अयोग्य हे सांगता येईल, असे बारी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "ते पुन्हा सत्तेत आले तर उद्धव ठाकरेंसह अनेकांना तुरुंगात टाकतील" मोदींच्या मिशनचा उल्लेख करत केजरीवालांचे आरोप

Latest Marathi News Live Update: मोदींनी तेलंगणाला मोठा निधी दिलाय, पण लोकांना तो मिळत नाहीये- अमित शहा

Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

Pakistan’s Vada Pav Girl: खातो की नेतो? दिल्ली नंतर आता पाकिस्तानमधील वडापाव दिदी झाल्या व्हायरल, चक्क ८० रुपयांचा वडा...

Srikanth film Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ ची जादू; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

SCROLL FOR NEXT