Supriya Sule Esakal
पुणे

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी खरंच जाहीर केली का बारामतीतून उमेदवारी? व्हॉटसअ‍ॅप स्टेटसची चर्चा, काय आहे प्रकरण?

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उमेदवारी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून जाहीर केल्याची चर्चा सध्याराजकीय वर्तुळात सुरू आहे. सुळे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्या फोटोसह पक्ष आणि निवडणूक चिन्ह या स्टेटसमध्ये असल्याने त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे का?

मिलिंद संगई, बारामती.

राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जय्यत तयारी सुरू केली आहे. एकीकडे पक्ष सभा, दौरे, जागावाटप यांच्याच व्यस्त असतानाच दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उमेदवारी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून जाहीर केल्याची चर्चा सध्याराजकीय वर्तुळात सुरू आहे. सुळे यांनी शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्या फोटोसह पक्ष आणि निवडणूक चिन्ह या स्टेटसमध्ये असल्याने त्यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी उमेदवारी जाहीर केलेली नाही. मी तिकीट मागितलं आहे. पक्षाला नवीन चिन्ह मिळालं आहे, ते मी आज स्टेटसला ठेवलं आहे. त्याचबरोबर माझं कामामुळे मला उमेदवारी मिळावी ही मागणी केली आहे. मी या निवडणुकीसाठी इच्छुक आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या व्हॉटसअँप स्टेटसवर उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळे, निशाणी तुतारी चिन्ह, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस व इव्हीएम मशीचे बटण असा मजकूर असलेली स्लाईड ठेवलेली आहे. या मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, सोनिया गांधी व उध्दव ठाकरे यांची छायाचित्रेही आहेत.

सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचीच एकप्रकारे घोषणा केली असे मानण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 2009, 20214 व 2019 अशा सलग तीन निवडणूका जिंकून खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चितच होती, त्याची अद्याप घोषणा झाली नसली तरी केवळ औपचारिकता मानली जात आहे.

दरम्यान स्वताः सुप्रिया सुळे यांनीच आपल्या व्हॉटसअँप स्टेटसला याचे सूतोवाच केल्याने त्यांची उमेदवारी आता निश्चित झाल्यासारखी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. सुप्रिया सुळे खासदार झाल्यापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघात सातत्याने सर्वच विधानसभा मतदारसंघाशी विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून हजेरी लावतात. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

यंदा राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांनी वेगळी भूमिका स्विकारलेली असल्याने सुप्रिया सुळे यांच्यापुढे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचे आव्हान असेल अशी चर्चा आहे. अद्याप सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी एकूण त्यांचेही मतदारसंघातील वाढते दौरे विचारात घेता त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेचीही केवळ औपचारिकताच उरलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT