पुणे

इंडस्ट्री 4.0साठी क्षमता विकास महत्त्वाचा -  आशुतोष पारसनीस

सकाळवृत्तसेवा

पुणे - "इंडस्ट्री 4.0' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिजिटल युगातील उद्योगांसाठी केवळ तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण नाही; तर उद्योगांच्या क्षमतांचा विकासही महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन न्यूबॉक्‍स कंसल्टन्सीचे संस्थापक संचालक आशुतोष पारसनीस यांनी केले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत आयोजित "ई दिशा-2.0' या रासायनिक उद्योगांतील परिषदेत ते बोलत होते. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअरचे अध्यक्ष डॉ. संजय कांबळे, अलोक पंडित आणि "एनसीएल'चे संचालक प्रा. अश्‍विनी कुमार नांगिया यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. 

पारसनीस म्हणाले, ""आजच्या उद्योगांचे स्वरूप हे भौतिकतेबरोबरच सायबर आणि पर्यावरण पूरकतेशी निगडित आहे. उत्पादनाच्या दृष्टीने स्मार्ट असलेल्या उद्योगांना संघटनात्मक आणि वैयक्तिक पातळींवर क्षमतांचा विकास करावा लागेल. तरच बदलत्या औद्योगिक पर्यावरणात आपण टिकाव धरू शकतो.'' उत्पादनाची निर्मिती करणारे "उद्योग' अशी परिभाषा आज करता येणार नाही. समस्यांचे निराकरण करणारा आणि पर्यावरणपूरक उत्पादन करणाऱ्या उद्योगांनाच "इंडस्ट्री 4.0' मध्ये महत्त्व आहे. डिजिटल युगात "उद्योगांच्या बदलत्या गरजा आणि व्यवस्थापन' याविषयी परिषदेत चर्चा करण्यात आली. परिषदेला देशभरातून उद्योगक्षेत्रातील सल्लागार, उत्पादक आणि संशोधक उपस्थित होते. 

केवळ धोरण आखण्यासाठी पैसा आणि वेळ वाया घालू नका; तर उद्योगांची कार्यसंस्कृतीत आणि सहकाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जास्त वेळ द्या. इंडस्ट्री 4.0साठी तंत्रज्ञान, परस्पर सहकार्य, डेटा आणि डिजिटल जागृती, समस्या निराकरण, व्यवसाय आणि नवनिर्मिती यांवर जास्त भर देणे गरजेचे आहे. 
- आशुतोष पारसनीस, संस्थापक संचालक, न्यूबॉक्‍स कंसल्टन्सी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना मोठा झटका, सिलिंडरच्या किमतीत वाढ

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT