पुणे, ता. २८ : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय सशस्त्र पोलिस दल’ (सीएपीएफ) परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) आर्थिक साह्य दिले जाणार आहे.
मुलाखतीची तयारी अधिक सक्षमपणे करता यावी, आर्थिक अडचणीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अनुसूचित जातीतील अधिकाधिक उमेदवारांनी यश संपादन करावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. १७ एप्रिलला ‘सीएपीएफ’ (२०२५) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालानुसार ज्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे, अशा विद्यार्थ्याला २५ हजार रुपयांची मदत एकरकमी स्वरूपात दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ‘बार्टी’च्या http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.