पुणे

‘कॅप्टन मच्छार यांचे कौतुक करण्यात राहुल गांधी गप्प का?’

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २ ः ‘‘अमेरिकेवरील ९/११ सारख्या हल्ल्याची घटना रोखण्याचे काम करणारे भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचे साऱ्या जगाने कौतुक केले. मग काँग्रेसचे नेते राहुल गांधी गप्प का आहेत?, अशी विचारणा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भांडारी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले, की जगातील प्रत्येक मोठा नेते मच्छार यांची स्तुती करत आहे, मात्र गांधी यांच्या तोंडातून एकही शब्द निघालेला नाही अथवा त्यांनी  मच्छार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी संवाद साधलेला नाही. ‘‘मतपेटीची चिंता सतावत असल्यामुळे राहुल आणि सोनिया गांधी हे मौन असावेत. गाझावर झालेल्या हल्ल्याच्या अनुषंगाने गांधी कुटुंबातील सदस्य असंख्य वेळा सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. पण शूर कॅप्टनबद्दल एक शब्द देखील ते काढत नाहीत, हा काही योगायोग नाही. नाइलाजास्तव काँग्रेस अध्यक्षांकरवी एक निवेदन जारी करण्यात आले,’’ असे टीका भांडारी यांनी केली.
‘‘देशाचे जवान जेव्हा दहशतवाद्यांना मारतात, तेव्हाही गांधी काही बोलत नाहीत. मतपेटीच्या राजकारणाची पिछेहाट होईल, अशी भीती त्यांना सतावत असावी. गांधी हे लोकशाहीचा तिरस्कार करतात, हे वास्तव आहे.  ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर मोठे नेते कॅ. मच्छार यांच्याबाबत मौन आहेत,’’ अशी टीका भांडारी यांनी केली.

‘भारतीयांचे कौतुक पचत नाही?’
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देखील या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्यांवर शरसंधान साधले आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका या गांधी कुटुंबातील सदस्यांनी एका भारतीयाच्या शौर्याची स्तुती करण्याची शिष्टता दाखवलेली नाही. शौर्यासाठी एखाद्या भारतीयाचे कौतुक होऊ नये, अशी या लोकांची भावना आहे की भारतीयांचे होणारे कौतुक यांना पचत नाही, हा विचार करण्यासारखा मुद्दा असल्याचे रेड्डी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT