पुणे

अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा

CD

पुणे, ता. १७ ः अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गाडीमालक आणि चालकाला मोटार अपघात न्यायाधिकरणाने दणका दिला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४४ लाख ७५ हजार रुपये ७ टक्के व्याजासह नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य बी. डी. कुलकर्णी यांनी दिला.
सुरेश (नाव बदलेले आहे) हे २६ नोव्हेंबर २०१५ रोजी कामावरून घरी परतत असताना शिरूर येथे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांनी ॲड. अमित राठी यांच्यामार्फत येथील न्यायाधिकरणात दावा दाखल केला. गाडीचा विमा नसल्याने गाडीमालक आणि चालकाविरोधात हा दावा दाखल करण्यात आला. सुरेश हे ४१ वर्षांचे होते. ते एका कंपनीत काम करत होते. त्यांना दरमहा २१ हजार ७१९ रुपये इतके वेतन होते. अपघाताबाबत पोलिसांनी कारवाई करून पंचनामा केला. ते कंपनीत नोकरीस असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या दाव्यात केली होती. दरम्यान, गाडीमालक आणि चालकाने त्यांची बाजू मांडताना अपघातास मयत व्यक्ती स्वतः कारणीभूत असल्याचा बचाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

SCROLL FOR NEXT