car-accident near nanded phata on sinhagad road Senior citizen injured police traffic pune marathi news Sakal
पुणे

Pune Accident News : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ कार-दुचाकीची जोरदार धडक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ राधाकृष्ण हॉटेलच्या समोर कार व दुचाकीची जोरदार धडक

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ राधाकृष्ण हॉटेलच्या समोर कार व दुचाकीची जोरदार धडक झाली असून या अपघातात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक सिताराम मते (रा. खडकवासला) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी पडलेल्या दुचाकीच्या स्थितीवरुन अपघाताची तीव्रता दिसून येत असून संबंधित कारचालक व इतर नागरिकांनी गंभीर जखमी झालेल्या सिताराम मते यांना तातडीने उपचारांसाठी नेले आहे.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास इको कार खडकवासला बाजूकडून पुण्याच्या दिशेने जात होती व पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सिताराम मते हे आपल्या दुचाकीवरून खडकवासल्याकडे येत होते. राधाकृष्ण हॉटेलच्या समोर या कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली यात सिताराम मते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर वेगात असलेली कार थेट दुभाजकावर चढलेली दिसून येत आहे. अपघातस्थळी दुचाकीच्या वेगवेगळ्या पार्ट्सचे तुकडे पडलेले असून दुचाकीचा पुढचा भाग पूर्णपणे चेंबला आहे.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे व्यावसायिक व नागरिक मदतीसाठी धावले. संबंधित कारचालक व इतर नागरिकांनी मते यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले मात्र गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना वेळ न घालवता शहरातील मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला संबंधित डॉक्टरांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार मतेंना शहरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे. सकाळची वेळ असल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. अपघात होऊन अर्धा ते एक तास उलटून गेला तरी पोलीसांना याबाबत माहिती मिळालेली नव्हती.

गतीरोधक गरजेचे परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष रस्त्याचे काम झालेले असल्याने वाहने वेगाने ये-जा करत असतात. मागील काही दिवसांपासून सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून यात काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परिसरातील नागरिक या रस्त्यावर गतीरोधक तयार करण्यासाठी सातत्याने मागणी करत आहेत परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. "अपघातस्थळी तातडीने पोलीस कर्मचारी पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल."

- सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT