Car caught fire in Katraj new tunnel 
पुणे

कात्रज नवीन बोगद्यात मोटारगाडीला आग

बोगद्यातील पंखे आणि दिवे बंद असल्याने बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर - कात्रज नवीन बोगद्यात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने पेट घेतला. सुदैवाने यात कोणाला काही दुखापत झाली नाही. मात्र बोगद्यातील पंखे आणि दिवे बंद असल्याने बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट होते. या धुराच्या लोटात आणि अंधारात प्रवाशांना गुदमरल्यासारखे झाल्याने प्रवाशांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज नवीन बोगद्यात (पुण्याहून शिंदेवाडीकडे येताना) मोटारीतील तांत्रिक बिघाडामुळे एका मोटारकारने अचानक पेट घेतला. मोटारीतील चौघे जण ताबडतोब बाहेर पडल्याने कोणाला काही ईजा झाली नाही. मात्र अग्निशामक यंत्रणा येइपर्यंत या आगीत संपूर्ण मोटार जळून खाक झाली. त्यातच बोगद्यातील दिवे आणि पंखे बंद असल्याने बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर झाला. अंधार आणि धूर यातून प्रवाशांना वाट काढता येत नसल्याने अनेक प्रवाशांची अवस्था त्या धुरात गुदमरल्यासारखी झाली. त्यामुळे यावेळी बोगद्यात अडकलेल्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. काही वेळात अग्निशामक दलाच्या बंबाने मोटारीची ही आग विझवली.

"बोगद्यात प्रवेश करताना आतमध्ये काय झाले याचा अंदाज येत नव्हता. मात्र अर्ध्या बोगद्याचे अंतर कापून पुढे आल्यावर पेट घेतलेली गाडी दिसली. धुराचा प्रचंड लोट आणि अंधार यामुळे पुढेही आणि मागेही जाता येईना. दुचाकी असल्याने अंदाज घेत घेत आम्ही बोगद्यातून बाहेर पडलो. मात्र तोपर्यंत धुरामुळे गुदमरल्यासारखे झाले होते. बाहेर येईपर्यंत प्रचंड भीती वाटत होती. बोगद्यात पंखे आणि दिवे बंद असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली," अशी प्रतिक्रिया सूरज नामदे आणि प्रतीक पवार या प्रवाशांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT