Car Accident sakal
पुणे

Car Accident : कादवे घाटात कार कोसळली; झाडाला गाडी अडकल्याने मुख्याध्यापिकेचे वाचले प्राण

पानशेत वेल्हे मार्गावरील कादवे घाट रस्त्यावर खोल दरीत टाटा टिगोर (क्रमांक एम एच १२, ओ जे ६०५१) कोसळली. मात्र सुदैवाने कार एका झाडाला अडकल्याने मुख्याध्यापिकेचे प्राण वाचले.

मनोज कुंभार

वेल्हे, (पुणे) - पानशेत वेल्हे मार्गावरील कादवे घाट रस्त्यावर खोल दरीत टाटा टिगोर (क्रमांक एम एच १२, ओ जे ६०५१) कोसळली. मात्र सुदैवाने कार एका झाडाला अडकल्याने मुख्याध्यापिकेचे प्राण वाचले. वैजयंती राजेंद्र देशमुख (वय-५३, रा. पुणे) असे शिक्षिकेचे नाव असून त्या ओसाडे (ता. वेल्हे) येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका आहेत. हा प्रकार आज सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे अंमलदार औदुंबर अडवाल यांनी दिली.

याबाबत पानशेत विभागाच्या केंद्रप्रमुख राजश्री गावडे म्हणाल्या शाळा दुरुस्ती नंतर राहिलेले पैसे रिफंड करण्यासाठी ते भरण्यासाठी मुख्याध्यापिका देशमुख ह्या वेल्ह्याकडे जाताना कादवे घाटात त्यांची गाडी कोसळली.

ओसाडे येथील शाळेतुन देशमुख या कारमधून एकट्याच वेल्हे येथे चालल्या होत्या. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पन्नास फुटापर्यंत दरीत कोसळली. परंतु सुदैवाने एका झाडाला गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात मुख्याध्यापिका देशमुख या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या परिसरामध्ये मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असताना सुद्धा देशमुख यांचा केंद्रप्रमुख गावडे यांच्याशी संपर्क झाला.

दरम्यान, केंद्रप्रमुख गावडे यांनी त्यांना धीर देत. 108 क्रमांकास वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये तसेच परिसरातील शिक्षकांना संपर्क केला. परिसरातील शिक्षकांना संपर्क झाल्याने घटनास्थळी शिक्षक रवी जगताप, सोमनाथ मेहत्रे, अतुल बगाडे हे घाटात दाखल झाले. परंतु त्यांना गाडी न दिसल्याने नक्की गाडी कुठे कोसळली हे लक्षात येत नव्हते. दरम्यान अपघात ग्रस्त मुख्याध्यापिकेस संपर्क करून गाडीचा हॉर्न वाजवण्यास सांगितला.

नंतर हॉर्नच्या दिशेने जात या तीन शिक्षकांनी व गणेश ठाकर, वैभव जागडे, रोहित कडू, अमोल जागडे या स्थानिक नागरिकांनी मुख्याध्यापिकेस गाडीच्या बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालय पुणे येथे दाखल करण्यात आले. तर घटनास्थळी वेल्हे पोलीस स्टेशन कर्मचारी व आपत्कालीन व्यवस्थापनचे तानाजी भोसले, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार, राजाराम होले यांनी पोलिस व आपत्कालीन व्यवस्थापनचे तानाजी भोसले, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने कार बाहेर काढली. या प्रकरणी वेल्हे पोलिस तपास करत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार कोसळला! 5 लाख कोटींचे नुकसान; मात्र हा शेअर 13% वाढला

Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Vadgaon Sheri News : बुलेटच्या सायलेन्सरवर फिरवला रोडरोलर; वडगाव शेरी आणि विमानतळ परिसरात पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Agriculture News : तळवडेत कडक उन्हातही बाजरीचे पीक तरारले, शेतकऱ्यांचा वाढता कल; कमी पाणी अन् खर्चही कमी असल्याचा परिणाम

SCROLL FOR NEXT