पुणे

पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर ''द बर्निंग मोटार''

CD

पाटस, ता.२७ः दौंड तालुक्यातील पाटस-दौंड अष्टविनायक मार्गावर शुक्रवारी (ता.२७) दुपारी "द बर्निंग मोटारी''चा थरार घडला. या घटनेत सुदैवाने कोणतीच जिवीत हानी झाली नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र,ही आग कशामुळे लागली याबाबत संभ्रम आहे. अष्टविनायक मार्गाने पाटस वरून दौंड दिशेला जाणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या मोटारीने पेट घेतल्याचा प्रकार समोर आला. गारफाटा परिसरात येताच मोटारीच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. सुरक्षितेच्या दृष्टीने चालकाने मोटार सुरक्षितस्थळी उभी करून तत्काळ बाहेर पडला अन मोटारीने क्षणार्धात पेट घेतला. घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन ग्रामस्थ नितीन शितोळे यांच्यासह काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,आगीमुळे अष्टविनायक मार्गावरील वाहतूक पाऊणतास ठप्प झाली होती. मात्र,या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत मोटार चालक किंवा मालक कोणीच पोलिस चौकीत फिर्याद देण्यासाठी आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोटारीला आग कशामुळे लागली शिवाय मोटारीत एकूण किती प्रवासी होते.याबाबत सर्व अनभिज्ञ आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक नारायण देशमुख व पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर म्हणाले, घटनास्थळी पोलिस कर्मचारी जाऊन आले. संबंधित घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी कोणीच आले नाही. या आगीत मोटारीची नंबरप्लेट ही जळाली.त री घटनेबाबत योग्य माहिती घेण्याचे काम सुरू आहे.




सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT