पुणे

कोरोनाच्या भीतीमुळे मोटारींचा खप वाढला! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संकटामुळे आपली स्वतंत्र गाडी बरी, हा विचार नागरिकांमध्ये रुजू लागला असून त्यामुळे शहरातील मोटारींचा खप वाढला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेवढ्या मोटारी विकल्या जवळपास तेवढ्याच मोटारी गेल्या महिन्यात विकल्या गेल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) झाली आहे. 

शहरातच नव्हे तर, राज्यातही मोटारींचा खप वाढू लागला आहे. त्यातच उत्पादक कंपन्यांनी आकर्षक सवलती दिल्या असून वित्त पुरवठ्यासाठीही बहुविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे स्वतंत्र वाहनाचा विचार नागरिकांमध्ये रुजू झाला आहे. काहीजण या पूर्वी प्रवासासाठी बस, कॅब, रेल्वेचा किंवा दुचाकीचा वापर करीत. परंतु, आता स्वतःच्या गाडीने फिरण्याकडे कल वाढला आहे. त्यातच सीएनजी, ई-कारचेही अनेक प्रकार आले आहेत. त्यामुळे इंधनाच्या दृष्टीने किफायतशीर पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा विचार करून ग्राहक स्वतःची मोटार घेण्यासाठी पुढे येत आहेत, असे वाहन क्षेत्रातील वितरकांचे निरीक्षण आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ""वाहन क्षेत्राची बाजारपेठ सावरू लागली आहे. गेल्यावर्षी इतकी वाहने यंदा विकली गेली नसली तरी, हळूहळू वाढ होत आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने वाहन उद्योगासाठी चांगले जातील, अशी चिन्हे आहेत.'' 

कोठारी ह्युंदाईचे संचालक राजेंद्र कोठारी म्हणाले, ""लोकांना आता पब्लिक ट्रान्स्पोर्टपेक्षा स्वतःचे वाहन सोयीचे वाटू लागले आहे. तसेच ग्रुपने प्रवास करण्यापेक्षाही स्वतःची गाडी असावी, असा विचार रुजत आहे. त्यामुळे एक गाडी असलेल्या कुटुंबामध्येही आता दुसरी गाडी घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घाटगे मोटर्सचे संचालक तेज घाटगे म्हणाले, ""मोटारींचा खप पुण्यातच नव्हे तर, कोल्हापूरमध्येही वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मोटार लोकांना सोयीची वाटत आहे. तसेच पब्लिक ट्रान्स्पोर्ट असुरक्षित वाटत असल्याने मोटार घेत आहोत, असे अनेक ग्राहकांनी मला सांगितले.'' मोटारींच्या किंमतीच्या रेंजमध्येही अनेक पर्याय आहेत. त्यामुळे प्रत्येकाला बजेटनुसार मोटार विकत घेता येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आर्किटेक्‍ट स्वप्ना बंग यांनी नुकतीच मोटार घेतली. त्यांच्या घरी या पूर्वी एक मोटार होती. परंतु, दुसरी मोटार का घेतली असे विचारला असता, त्या म्हणाल्या, ""या पूर्वी मी दुचाकीने कामाच्या ठिकाणी जात होते. परंतु, प्रदूषण, गर्दी यामुळे असुरक्षित वाटते. कोरोनामुळे स्वतंत्र मोटार असली पाहिजे, हा विचार पक्का झाला. त्यामुळेच सुरक्षितता, कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी मी नुकतीच मोटार विकत घेतली.'' 

वाहनाचा प्रकार -----सप्टेंबर 20 ---------सप्टेंबर 19 
मोटार -----------2877-------------- 3013 
दुचाकी -----------6626--------------- 12744 
मालवाहतुकीच्या गाड्या- 502-------------855 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT