Career guidance on AI ChatGPT sakal Vidya Expo Workshop by Amit Andre and Ankit Bhargav sakal
पुणे

Sakal Vidya Expo : एआय, चॅटजीपीटीवर करिअर मार्गदर्शन

सकाळ विद्या एक्स्पो; अमित आंद्रे आणि अंकित भार्गव यांची कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही चॅटजीपीटी किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रात करिअर करू इच्छिता? चॅटजीपीटी करिअरला कितपत प्रभावित करेल माझ्या कामासाठी चॅटजीपीटीची मदत मिळेल ? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३ मधील कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे ९, १० आणि ११ जून रोजी सकाळ विद्या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता एक्स्पोचे उद्‍घाटन होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता फॉक्सबेरी टेक्नोलॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव हे ‘चॅटजीपीटी’वर आणि शनिवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता डेटा टेक लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित आंद्रे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या विषयावरील कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे करिअरच्या बदलत्या संधीबद्दल ते मार्गदर्शन करणार आहे. सध्या सर्व क्षेत्रांमध्ये एआय आणि चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, गेल्या काही महिन्यांत दहा लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते या तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत.

वस्तूत: विविध प्रकल्पांसाठी चॅटजीपीटी यापूर्वीपासून वापरले जात आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान नुकतेच उपलब्ध झाले आहे. आपले दैनंदिन कामकाज सोपे आणि प्रभावी होण्यासाठी चॅटजीपीटीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पुण्यासह राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था यात सहभागी होणार असून दिग्गज मार्गदर्शकांची व्याख्याने ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

सकाळ माध्यम समूह आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ हा चाणक्य मंडल परिवार प्रस्तुत आहे. तर पॉवर्ड बाय एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी आणि एमआयटी एडीटी युनिर्व्हसिटी आहे. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करियरच्या पर्यायांची माहिती एकाच छताखाली मिळू शकणार आहे.

हे लक्षात ठेवा

  • कालावधी : ९ ते ११ जून

  • स्थळ : गणेश कला क्रीडा मंच

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत

शुक्रवारची व्याख्याने

  • दुपारी २ वा. ः विवेक वेलणकर (मार्गदर्शक) : दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी

  • दुपारी ३.३० वा. ः प्रा. गोविंद घुले (सहाय्यक प्राध्यापक, एमआयटी एडीटी) : ‘मर्चंट नेव्ही’मध्ये करिअरच्या संधी

  • सायंकाळी ५ वा. ः अंकित भार्गव (मार्गदर्शक) : हाऊ टू युज चॅट जीपीटी इफेक्टिव्हली

आजच्या युगाची सर्वांत परिवर्तनशील गोष्ट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. ती आत्मसात करून विद्यार्थी डेटा विश्लेषण, प्रत्यक्ष समस्या सोडविण्याचे कौशल्य प्राप्त करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींचे दरवाजे उघडतात. कार्यशाळेच्या माध्यमातून आपण या ज्ञानवर्धक प्रवासाला सुरुवात करू या, आपल्या क्षमतांचा ताळेबंद उघडून आणि शक्यतांनी परिपूर्ण जगाला आकार देऊ या.

- अमित आंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डेटा टेक लॅब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : रामदास आठवले चिडले, राज ठाकरेंची दादागिरी; जसाश तसे उत्तर देणार, परप्रांतियांना मराठीवरून मारणे चुकीचं

Latest Maharashtra News Updates : चाकण चौकातील वाहतूक कोंडीविरोधात स्थानिकांचे शांततामय आंदोलन

धक्कादायक! प्रेयसीशी मोबाईलवर बोलत बोलत तरुणानं घेतला गळफास; 19 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ, असं दोघांत काय घडलं?

Pravin Gaikwad: मला जीवे मारण्याचा प्रयत्न... मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा मोठा आरोप, व्हिडिओ पुरावा दाखवला

Teacher Recruitment Scam : शिक्षक भरती प्रक्रियेत लाखोंच्या मागण्या, उमेदवारांची आर्थिक छळवणूक; ‘इन कॅमेरा’ मुलाखतींची मागणी

SCROLL FOR NEXT