Pune Airport sakal
पुणे

Cargo Service : कार्गो आयात सेवेला पुणे विमानतळावर मिळेना मुहूर्त

पुणे विमानतळावर सध्या दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी दोन उड्डाणांची वाढ होईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे विमानतळावर सध्या दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी दोन उड्डाणांची वाढ होईल. सिंगापूर, दुबईनंतर आता बँकॉकला पुण्याहून थेट विमानसेवा सुरू होत आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करूनही मालाची (कार्गो) आयात सेवा सुरू झालेली नाही. वाहतूकदारांचा व विमान कंपन्यांचा आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने पुण्यात मालाच्या आयात सेवेला सुरुवात झालेली नाही.

पुणे विमानतळावरून देशांतर्गत मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. सिंगापूर व दुबईसाठी पुण्यातून माल पाठविला जात आहे. आयात सेवेला वाहतूकदारांचा काहीच प्रतिसाद नसल्याने वर्षभरापासून अद्याप एकही सेवा सुरू झालेली नाही. सेवा सुरू व्हावी, यासाठी विमानतळ प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. यात स्ट्राँग रूमपासून ते धोकादायक वस्तूंपर्यंतचा (डीजी) समावेश आहे. आतापर्यंत दोन कंपन्यांनी विचारणा केली; मात्र काही केल्या मालाची आयात सेवा सुरू झालेली नाही.

प्रशासनाने दिलेल्या सुविधा

  • एक हजार डॉलरपेक्षा अधिक मुल्याच्या वस्तू ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम

  • कार्गो टर्मिनलमध्ये स्ट्राँग रूम तयार

  • कोल्ड स्टोअरेजचीही सुविधा उपलब्ध

  • धोकादायक वस्तूंसाठी स्वतंत्र व्यवस्था

आयात-निर्यातीचा फायदा

  • छोट्या, मोठ्या उद्योजकांच्या व्यवसायाला चालना

  • कमी वेळेत मालाची उपलब्धता

  • पैशांची बचत

  • अन्य शहरांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध

आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा प्रवास

१) पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू होण्याआधी मालवाहतूक सेवा सुरू

२) १४ एप्रिल २००५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे उड्डाण

३) १२ डिसेंबर २००५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाचे दुबईकडे उड्डाण

४) १३ डिसेंबर २००५ रोजी सिंगापूरकडे प्रवासी विमानाचे उड्डाण

पुणे विमानतळ प्रशासनाने केवळ प्रवासी विमानातून माल वाहतुकीला प्राधान्य न देता, त्यासाठी मालवाहू विमानांचा वापर करावा. त्यादृष्टिने प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच उद्योजकांशी चर्चा करून आयात-निर्यात सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

- हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर

पुणे विमानतळावर मालाची आयात-निर्यात सेवा सुरू होण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा दिलेल्या आहेत. मात्र वाहतूकदारांचा अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे आयात सेवा अद्याप सुरू झालेली नाही. या सेवेबाबत केवळ चौकशी होते. प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही.

- प्रदीप कुमार, उप सरव्यवस्थापक, कार्गो टर्मिनल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT