pune airport sakal
पुणे

Pune Airport : पुणे विमानतळावरील कार्गोसेवेला पुन्हा सुरुवात

पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा (मालवाहतूक) पुन्हा सुरू झाली. मंगळवारी (ता. १२) पुण्याहून सिंगापूरला १२३ किलो वजनाचे कार्गो पाठविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा (मालवाहतूक) पुन्हा सुरू झाली. मंगळवारी (ता. १२) पुण्याहून सिंगापूरला १२३ किलो वजनाचे कार्गो पाठविण्यात आले.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानात कार्गोसाठी जागा नसल्याचे सांगून हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी कार्गोच्या वाहतुकीस नकार दिला. एक महिन्यापासून पुणे विमानतळावरची आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा बंद होती.

‘महिनाभरातच कार्गोसेवा ठप्प’ अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर सीमाशुल्क विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी सोमवारी (ता. ११) विमानतळावरील कार्गो टर्मिनलला भेट दिली. प्रशासनाबरोबर चर्चा करून मंगळवारी (ता. १२) कार्गोसेवा पुन्हा सुरू झाली.

यावेळी विमानतळ संचालक संतोष ढोके यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपसरव्यवस्थापक (कार्गो) प्रदीप कुमार म्हणाले, ‘‘काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा बंद होती. मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT