पुणे

गाजर गवत निर्मूलनासाठी ‘केव्हीके’चे मार्गदर्शन

CD

नारायणगाव, ता. २१ : येथील कृषी विज्ञान केंद्राच्या(केव्हीके) वतीने गाजर गवत निर्मूलन सप्ताह सुरू आहे. यावेळी केव्हीकेच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना गाजर गवताचे यांत्रिक, जैविक व आवश्यकतेनुसार रासायनिक नियंत्रण कसे करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
हा सप्ताह रविवार (ता. १६) ते शनिवारदरम्यान (ता. २२) सुरू असून त्याचा प्रारंभ कांदळी वडामाथा (ता. जुन्नर) येथे करण्यात आला. गाजर गवत मुक्त परिसर - निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित शेती” हा संदेश यावेळी देण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. राहुल घाडगे म्हणाले की, ‘‘गाजर गवत हे अत्यंत आक्रमक तण आहे. यामुळे पिकांशी अन्नद्रव्ये, पाणी व जागेसाठी स्पर्धा निर्माण होऊन पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्याच्या परागकणांमुळे मानवांमध्ये त्वचेची आग, खाज आणि श्वसनासंबंधी त्रास होऊ शकतो.
तसेच, कार्यक्रमात डॉ. दत्तात्रेय गावडे, प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी दीपक गोपाळे, जालिंदर घाडगे, तानाजी रेपाळे, गोविंद गोपाळे, नामदेव गोपाळे, गणेश घाडगे, सचिन घाडगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT