पुणे

Pune News : लाच घेतल्याप्रकरणी ससूनमधील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ससून रुग्णालयामधील एका कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून ससून रुग्णालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय ५५) असे गुन्हा दाखल केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कुंभार हा ससून रुग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे. ‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने ससून रुग्णालयात एक लाख ४३ हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी अर्ज दिला होता.

या बिलाच्या मंजुरीसाठी कुंभार याने वैद्यकीय बिलाच्या दोन टक्के रक्कम यानुसार तक्रारदाराकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने २९ नोव्हेंबर रोजी ‘एसीबी’च्या पुणे कार्यालयात अर्ज दिला होता. या तक्रारीची पडताळणी करून कुंभारला तीन हजारांची लाच घेताना ताब्यात घेतले.

‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलिस हवालदार नवनाथ वाळके, सरिता वेताळ, पोलिस कर्मचारी प्रवीण तावरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT