case filed against those who run prostitution business under name of spa center pune esakal
पुणे

Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कोंढव्यात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असलेल्या स्पावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घालून तीन परदेशी तरुणींसह चौघींची सुटका केली. तसेच स्पाचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोंढवा येथील लुल्लानगर परिसरातील एका इमारतमीध्ये "लाना स्पर्श स्पा' नावाचा स्पा सुरु होता. त्यामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यावसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकास मिळाली होती.

त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी तेथे तीन परदेशी तरुणी व एक भारतीय तरुणी अशा चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. तसेच संबंधित स्पाचा मालक व व्यवस्थापक अशा दोघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर व्यवस्थापकास ताब्यात घेण्यात आले आहे. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्‍विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलिस कर्मचारी प्रमोद मोहिते, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT