marriage.jpg 
पुणे

ऐकलतं का? आळंदीत लावले जातेय चोरून लग्न

सकाळवृत्तसेवा

आळंदी (पुणे) : येथे दोन दिवसांपूर्वी पद्मावती रस्त्यावरील एका कार्यालयाच्या चालकावर तर आज (ता. 24) माऊली मंदिराच्या गणेश दरवाजासमोरील एका कार्यालयाच्या चालकावर लग्न लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर सांगितले. खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या लॉकडाउनच्या काळात आळंदीत लग्न लावण्यास बंदी असल्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. आळंदीतील मंगलकार्यालयांत चोरून दिवसाच काय रात्री अपरात्री देखील लग्न लावली जात आहेत. खास करून मंदिर परिसरात भराव रस्त्यावरील मंगलकार्यालयात जेवणासह लग्न लावली जात आहे. तर गणेश दरवाजासमोर, वडगाव रस्ता, मरकळ रस्त्यावर लग्न लावली जात आहे. रोज एका एका कार्यालयात किमान पाच चोरून लग्ने लावली जात असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउनच्या काळात आळंदीत लग्न लावण्यास बंदी असल्याचा आदेश खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला होता. मात्र प्रांताधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित अनेक मंगलकार्यात चोरून लग्न लावण्याचा सपाटाच लावला. आळंदीतील बहुतांश मंगल कार्यालयामुळेच आळंदीकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी आळंदीत चालणा-या लग्नांमुळे कोरोनाची लागण होवू शकते असा अहवाल प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिला होता. त्यावरून कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रांताधिकारी तेली यांनी मंगळवारी (ता. १९) स्थानिक आळंदीकर वगळता इतरांच्या लग्नांना सरसकट बंदी घातली होती.

आदेशानंतर आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर आणि मुख्याधिकारी समिर भूमकर यांनी एकत्रित व्हीडीओ काढून प्रांताधिका-यांच्या आदेशाने लग्नास बंदी असून लग्न लावणा-यांवर गुन्हा दाखल केला जाईल असा व्हिडीओ आळंदीत सोशल मिडियावर प्रसारित केला. मात्र, त्याला कोणीही दाद दिली नाही. या उलट आदेशाचा भंग करून अनेक मंगल कार्यालयांनी लग्न लावण्यास सुरूवात केली. 

स्थानिक पोलिस आणि पालिका मात्र सोयिस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आळंदीलगतच्या मोशी, च-होली, दिघी भागात कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही ही वस्तुस्थिती माहित असूनही आळंदीत कोरोनाची धास्ती न घेता अनेकजण पैसे कमविण्यासाठी वाटेल ते करायला तयार असल्याचे चित्र आहे. शेजारच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोजच दिसून येतो. आळंदीतील विविध मंगल कार्यालय, धर्मशाळा आणि घरातही लग्न कार्ये, लग्नाचे विधी बिनदिक्कत पार पडतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनेकांनी लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वीच लग्नांची बुकिंग केली होती. तर काही पळून आलेली लग्ने असल्याने पैसा सोडायला मंगल कार्यालयवाले तयार नाहीत. यामुळे रात्री अपरात्रीच काय पण आता दिवसाही लग्ने लावत आहेत. यामधे काही उत्साही मंडळी लग्नासाठी आलेल्यांना जेवणही बनवून देत असल्याचे चित्र आहे. खास करून मंदिर परिसरात भराव रस्त्यावरील मंगल कार्यालयात जेवणासह लग्न लावली जात आहे. तर गणेश दरवाजासमोर, वडगाव रस्ता, मरकळ रस्त्यावर चोरून लग्न लावली जात आहे. रोज एका एका कार्यालयात किमान पाच चोरटी लग्ने लावली जात असल्याचे चित्र आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: डहाणू-विरार लोकल प्रवास आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर पहिली १५ डब्यांची ट्रेन सुरू; प्रवाशांना दिलासा

बाऊन्सरपेक्षा 'तिला' घाबरतो! भर कार्यक्रमात चेन्नईच्या कर्णधाराने दिली कबुली; पाहा व्हिडिओ...

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना ! ९ वर्षांच्या मुलीची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले

Konkan Hapus Festival : कोकण हापूसचा सुगंध दिल्लीत दरवळला! हजार डझन आंबा तीन तासांत संपला; आंब्याचा सध्या कसा आहे दर?

6 महिन्याची गर्भवती असताना अभिनेत्री जीममध्ये करतेय वर्कआऊट, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT