Land_Survey 
पुणे

सरकारी मोजणी करणाऱ्या लँड सर्व्हेअरला धक्काबुक्की; आळंदीत घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

आळंदी (पुणे) : अतितातडीची सरकारी मोजणीचे काम सुरू असताना भूकरमापकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जमीन मोजणीचे काम सुरू असताना खेड मोजणी कार्यालयातील भूकरमापक यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याअंतर्गत चौघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता.२८) दुपारी बारा वाजता आळंदीजवळ पिंपळगाव तर्फे चाकण येथे घडली. या प्रकरणी भूकरमापक कुणाल पुरुषोत्तम भगत (वय २६) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शंकर भगवान टिंगरे, दत्तात्रय भगवान टिंगरे आणि अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे, तर शंकर टिंगरे याला अटक केली आहे.

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथे एका  जमिनीची अतितातडीची मोजणी करण्यासाठी खेड येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे भूकरमापक कुणाल भगत आले होते. त्यावेळी आरोपींनी मोजणीचे काम सुरू असताना फिर्यादी भूकरमापक कुणाल भगत यांना धक्काबुक्की केली. ‘तुम्ही आमच्या जमिनीची कोणाच्या आदेशानुसार मोजणी करण्यासाठी आला आहात, तुम्ही मोजणी करायची नाही’ असे म्हणून आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच याठिकाणी बंदोबस्तासाठी आलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनाही अरेरावी केली. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT