Pune News Esakal
पुणे

Pune News: पुण्यात चप्पल चोर! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोबाईल, दागिने चोरीनंतर आता पुण्यात चक्क चप्पल चोर

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल ५५ चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी मिळून तब्बल ३० ते ४० हजार रुपयांचे ५५ चप्पलांचे जोड लंपास केले आहेत. यातील ४० मेन्स शूज तर १५ लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या आहेत.

हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात फिर्याद दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करून पसार झाले.

अशिक्षित असल्यामुळे या तरुणांनी उदरनिर्वाह तसेच दारू पिण्यासाठी ही चोरी केल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. खडकी पोलिस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे अहुजा यांच्या लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT