पुणे

हॉटेलच्या स्वच्छतागृहात तरुणीचे मोबाईलवर चित्रीकरण; वेटरविरुद्ध गुन्हा दाखल 

पांडुरंग सरोदे

पुणे ः हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरुणीचे स्वच्छतागृहामध्ये वेटरने मोबाईलवरुन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमववारी साडे नऊ वाजता सुतारवाडी येथे येथे घडली. याप्रकरणी वेटरविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हाफिज अन्सारी (वय 18) असे गुन्हा दाखल झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू-मुंबई महामार्गालगत सुतारवाडी येथे "हॉटेल हॅपी द पंजाब' नावाचे हॉटेल आहे. फिर्यादी तरुणी हि तिच्या कुटुंबीयांसमवेत सोमवारी रात्री साडेनऊ वाजता संबंधित हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. काही वेळाने तरुणी हॉटेलमधील स्वच्छतागृहामध्ये गेली.

तेव्हा हाफीज हा तरुणीचे मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे तरुणीच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे संतापलेल्या तरुणीने हाफीजला मोबाईल चित्रीकरणाबद्द जाब विचारला. या प्रकारामुळे हाफीज हा घाबरून तेथून पळून गेला. 

दरम्यान, हॉटेलमध्ये घडलेल्या अशा घटनेमुळे फिर्यादी व तिचे कुटुंब संतप्त झाले त्यांनी या घटनेनंतर थेट चतुःश्रृंगी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हाफीज फरारी असून, चतुःश्रृंगी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT