पुणे

आळंदी पोलिसमित्र म्हणवणार्‍या बहाद्दरावर विनयभंगप्रकरणी गुन्हा

विलास काटे

आळंदी : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलिस मित्र म्हणवणार्‍या संदिप गुळवे (रा. आळंदी) यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुळवे अद्याप फरार असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली आहे. याबाबत फिर्याद पिडित महिलेने दिली आहे.

बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास चर्‍होली खुर्दच्या कृष्णा आयकाॅन इमारतीजवळ घटना घडली. फिर्यादी महिला कपड्याचे दुकान बंद करुन दुचाकीवरुन निघाली असता, आळंदीत प्रदक्षिणा मार्गावर आरोपी गुळवे याने फिर्यादी महिलेस हाक मारली. यावर आरोपीकडे दुर्लक्ष करत महिला मरकळ रोडने पुढे गेली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तरीही आरोपीने पाठलाग केला आणि महिलेची गाडी अडवली. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला मोबाईल नंबर दे. तु माझ्या प्रेमास नकार दिला तर आत्महत्या करण्ययाची धमकीही आरोपीने दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान पिडीतेच्या मैत्रिणीचा मुलगा घटनास्थळी आल्याने पुढील संकट टळले.  संशयित आरोपी गुळवे आळंदी पोलिसांच्या गेली दहा वर्षे संपर्कात असून पोलिस ठाण्यात वारंवार वावर असतो. पोलिसमित्र म्हणूनही तो मिरवत होता. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT