Pune Drugs News sakal
पुणे

Pune Drugs News : गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

कुरकुंभ येथील एका कंपनीतील मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मेफेड्रोन तयार करून साथीदारांमार्फत विविध शहरांत पाठवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कुरकुंभ येथील एका कंपनीतील मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या निर्मितीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मेफेड्रोन तयार करून साथीदारांमार्फत विविध शहरांत पाठवले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विश्रांतवाडीतील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीत पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत सुमारे ६०० किलो मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला. याची बाजारपेठेतील किंमत सुमारे एक हजार २०० कोटी रुपये आहे. कुरकुंभ येथीस कारवाईत भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा) आणि युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) यांना अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी येथील कारवाईत वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख अटकेत आहेत.

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी न्यायालयात सांगितले की, साबळे हा अर्थकेमचा मालक आहे. त्याने केमिकल इंजिनिअर भुजबळच्या मदतीने मेफेड्रोनचा फॉर्म्युला आणि कच्चा माल तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. साबळे आणि भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन तयार केले आहे. ते साथीदारांमार्फत वेगवेगळ्या शहरांत पाठविले आहे.

पोलिस कोठडीची मागणी

आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरून किती मेफेड्रोन तयार केले. मेफेड्रोन कोणाला दिले आहे. मेफेड्रोनची निर्मिती करण्यासाठी लागणारा कच्चा माल त्यांनी कोठून आणला, याचा तपास करायचा आहे. तसेच आरोपी इतर आरोपींच्या कसे संपर्कात आले आहेत, याची चौकशी करायची असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षा असलेकर यांनी केली. बचाव पक्षाच्या वतीने आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

माल घेण्यासाठी तिघे येणार होते...

भुजबळ हा कुरकुंभ येथील कारखान्यात गेला असता साबळे याने कामगारांना त्याच्याबाबत कल्पना दिली. भुजबळला एक उत्पादन बनवून द्यायचे आहे. त्यासाठी भुजबळ कच्चा माल पुरवणार असून फॉर्म्युलाप्रमाणे उत्पादन तयार करायचे आहे. हा माल घेण्यासाठी तिघे जण कुरकुंभ येथे येत असल्याचे त्याने कामगारांना सांगितले होते. आता त्या तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT