case registered against 34 people in Faraskhana and Kondhwa police station for spreading rumors of Sheikh Salla Dargah Sakal
पुणे

Pune Dargah Case : कसबा पेठेतील शेख सल्ला दर्गाप्रकरणी अफवा; ३४ जणांविरुद्ध गुन्हा

कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवून चिथावणी दिल्याप्रकरणी फरासखाना आणि कोंढवा पोलिस ठाण्यांत ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरवून चिथावणी दिल्याप्रकरणी फरासखाना आणि कोंढवा पोलिस ठाण्यांत ३४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस हवालदार प्रमोद जगताप यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून माहिती-तंत्रज्ञान कायदा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख सल्ला दर्ग्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईबाबत काहींनी शुक्रवारी रात्री चुकीची माहिती पसरवली. त्यामुळे कसबा पेठ परिसरात चार ते पाच हजार नागरिक जमा झाले. दोन समाजामध्ये तेढ होईल, अशी अफवा पसरल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोंढवा पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कसबा पेठेतील शेख सल्ला दर्ग्यावरील कारवाईबाबत समाजमाध्यमातून अफवा पसरविणे आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस नाईक सुभाष जरांडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही जणांनी खातरजमा न करता दर्ग्यावरील कारवाईबाबत अफवा पसरवली. त्यामुळे कसबा पेठेत शुक्रवारी रात्री मोठ्या संख्येने जमाव जमला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT