bribe crime esakal
पुणे

Pune Crime : कर्जप्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी मागितली लाच; वसुली अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime : राजाराम मारुती डेरे (रा. शिक्रापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्ज प्रकरणात जामिनदाराविरुद्ध दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी वसुली अधिकाऱ्याने सव्वा तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्रापूर येथील एका सहकारी बॅंकेत हा प्रकार घडला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने शिरूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाराम मारुती डेरे (रा. शिक्रापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांच्या मित्राने २०१३ मध्ये शरद सहकारी बॅंकेच्या शिक्रापूर शाखेकडून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणात तक्रारदार जामीनदार राहिले होते. कर्जाची रक्कम थकल्याने अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, पुणे यांनी वसुली अधिकारी डेरे यांची नियुक्ती केली. कर्जदार रक्कम भरण्यास अपात्र झाल्याने कर्जदार आणि जामीनदाराविरुद्ध तक्रार, तसेच दावा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार जामिनदाराने नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून उर्वरित कर्जाची सर्व रक्कम जामीनदार या नात्याने कर्ज खात्यात भरली, तसेच कर्ज बाकी नसल्याचा बॅंकेकडून दाखला घेतला. त्यानंतर तक्रारदार यांनी बॅंकेच्या संचालक मंडळास कर्ज वसुलीच्या दरम्यान दाखल केलेल्या तक्रारी, तसेच दावे मागे घेण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यास शरद सहकारी बँक, शाखा शिक्रापूर यांनी मान्यताही दिली होती, त्याबाबतचा आदेश बॅंकेने अधिकारी डेरे यांना दिला होता. त्यानुसार, तक्रारदार वसुली अधिकारी डेरे यांच्याकडे तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र, डेरे यांनी तक्रारदाराविरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी सव्वा तीन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली. तेव्हा डेरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT