Baramati Crime News sakal
पुणे

Baramati Crime News : बारामतीत दोन कोटींच्या अपहारप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल...

कर्ज खतावणीत चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा नियमांचे उल्लंघन करत विनातारण कर्ज

मिलिंद संगई, बारामती

बारामती : सुमारे दोन कोटी 18 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बारामतीती शांकभरी नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अनिल बबनराव गलांडे (रा. शांभवी, अशोकनगर, बारामती) तत्कालिन सचिव मुकुंद महादेव गिजरे

(कसबा, बारामती) श्रीमती मंजुश्री विठ्ठल दुगम (रा. गोकुळवाडी, बारामती) यांच्याविरुध्द बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत विशेष लेखापरिक्षक सुनिल मथुरा काळे (रा. वडगाव, ता. करमाळा, सोलापूर) यांनी फिर्याद नोंदविली आहे.

फिर्यादीत नमूद आहे की, एप्रिल 2010 ते मार्च 2022 या कालावधीत शाकंभरी पतसंस्थेचे तत्कालिन अध्यक्ष अनिल गलांडे, सचिव मुकुंद गिजरे व मंजुश्री दुगम यांनी कर्जव्यवहारात गैरव्यवहार करुन 2 कोटी 18 लाख 77 हजार रुपयांचा अपहार केला आहे. खोटी व बनावट कर्ज प्रकरणे तयार करुन,

कर्ज खतावणीत चुकीच्या नोंदी नोंदवून सहकारी कायदा नियमांचे उल्लंघन करत विनातारण कर्ज देत, अपु-या कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप करुन संस्था व ठेवीदारांची फसवणूक केली आहे. अधिकाराचा गैरवापर व पदाचा दुरुपयोग करुन, संस्था व सभासदाचा विश्वासघात करून तसेच फसवणूक करुन अपहार केल्याचे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance Tips: हेल्थ इन्शुरन्स घेताना या गोष्टी तपासल्या नाहीत तर Claimच्या वेळी बसू शकतो मोठा धक्का!

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर कर्जतला पहाटे दाट धुक्याची चादर; आल्हाददायक वातावरणाने नागरिक सुखावले

Kolhapur Gokul Election: ‘गोकुळ’च्या एका जागेवरून महायुतीत तिढा; राष्ट्रवादीला आणखी एक जागा, यड्रावकर गटाच्या जागेवरून घमासान

SCROLL FOR NEXT