पुणे

पुणे : 'शंखनाद' महागात! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

विनायक होगाडे

पुणे : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 ऑगस्ट रोजी मंदिर उघडण्यासाठी केलेल्या शंखनाद आंदोलनामध्ये कोरोना नियमावलीचं पालन न केल्याबद्दल हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 ऑगस्ट रोजी हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी शहाराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, आमदार मुक्ताताई टिळक यांच्यासह शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंदीरांची वेळ ठरवून आणि भाविकांची संख्या निश्चित करुन ही परवानगी द्यावी, अशी भूमिका भाजपने या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली होती.

या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामदैवत श्री. कसबा गणपती मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, या आंदोलनात कोरोना नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या आंदोलनात सहभागी नेत्यांवर तसेच कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 1ST ODI: शुभमन गिलने अचानक मैदान सोडले, श्रेयससोबत चांगला खेळत होता अन्... नेमकं काय घडलं? BCCI म्हणते...

Chokhala rain ritual: पावसासाठी चोखाळा गावात बाहुला-बाहुलीचा अनोखा विवाहसोहळा; वरुणराजाला साकडे घालत ग्रामस्थांचा आगळावेगळा उपक्रम

Donald Trump: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरील 20 टक्के 'टोल'चा प्रस्ताव रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

Pune Clerks Transfers Delayed: पुणे महापालिकेत ४५० लिपिकांच्या बदल्या रखडल्या; खास कर्मचाऱ्यांना गुप्तपणे ‘चॉईस पोस्टिंग’मुळे अस्वस्थता

Pune News : स्वीकृत झेडपी सदस्यांसाठी नव्याने अधिसूचना; हरकती व सूचनांसाठी तीस दिवसांचा कालावधी

SCROLL FOR NEXT