Crime News  sakal
पुणे

Crime News: एनएसयूआयच्या पुणे विद्यापीठ अध्याक्षाविरोधात गुन्हा; विद्यार्थिनीचा केला छळ

सकाळ वृत्तसेवा

Pune News: विद्यार्थिनीचा मानसिक छळ आणि दुर्व्यवहार केल्याच्या प्रकरणात पुणे विद्यापीठ एनएसयूआय संघटनेचा अध्यक्ष अक्षय कांबळे याला निलंबित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने कांबळे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) यासंबंधी समाजमाध्यमाद्वारे माहिती दिली आहे. मोबाईलवर विद्यार्थिनीला मेसेज करत कांबळे याने त्रास दिला. तसेच समोर येऊन बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या विद्यार्थिनीचा मानसिक छळ केला, असा आरोप अभाविपने केला आहे.

संबंधित विद्यार्थिनीने या सर्व घटनेची पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलिस प्रशासनाने विनयभंग व विद्यार्थिनीला छळ केल्याप्रकरणी कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

तिने अक्षय कांबळे विरोधात व्हिडिओ प्रसिद्ध करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा कारवाई करून सर्व विद्यार्थिनींना सुरक्षेच्या दृष्टीने आश्वस्त करावे, असे निवेदन अभाविपकडून कुलसचिवांना देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT