Crime 
पुणे

मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणे एकाला पडले महागात

सकाळवृत्तसेवा

आळंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने आळंदीतील एकावर गुन्हा दाखल केला. नवनीतकुमार देशमुख, असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली. 

याबाबतची फिर्याद आळंदीतील राष्ट्रवादी कॉंग्रसचे पदाधिकारी व माजी नगरसेवक डी. डी. भोसले यांनी दिली. आरोपी नवनितकुमार देशमुख याने एका पोस्टवर गलिच्छ भाषेत टिका केली. याबाबत आळंदीत शिवसैनिक व वारकरी संप्रदायामध्ये क्षोभ निर्माण झाला. अखेर डी. डी. भोसले यांनी देशमुख याच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

देशमुख हा मूळचा जिंतूरचा असून, आळंदीत शिकण्यासाठी काही काळ होता. सध्या तो जिंतूरमध्येच वास्तव्यास आहे. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर मात्र आळंदीचाच रहिवासी असल्याचे दिसून येत आहे. त्याला अद्याप अटक केली नाही. याबाबत अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत. 

भोसले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम करत आहेत. शांत व संयमी माणसाबाबत आक्षेपार्ह भाष्य गैर असल्याने तक्रार दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT