पुणे

कोरोना बाधित रुग्णांसाठी कॅशलेस सेवा पण लूट सुरूच 

अनिल सावळे-सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनावरील उपचारासाठी 72 वर्षीय वडिलांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या रुग्णालयाने मोफत उपचार केले. परंतु रुग्णालयाने रेमडीसिव्हर इंजक्‍शन बाहेरून आणण्यास सांगितले. तुटवडा असल्यामुळे ते इंजक्‍शन मिळत नव्हते. शेवटी रुग्णालयाने त्या सहा इंजेक्‍शनचे 32 हजार चारशे रुपये घेतले. परंतु शेवटी वडिलांचे निधन झाले. सगळंच संपलं... पद्मावती कॉर्नर येथील त्यांचा मुलगा सांगत होता. या घटनेवरून सरकार मोफत उपचार करीत असल्याचा दावा करीत असले तरी रुग्णांची लूट सुरूच असल्याचे समोर येत आहे. 

कोरोना बाधितांवर मोफत उपचार : 
कोरोना बाधित रुग्ण गरीब, मध्यमवर्गीय असो की श्रींमत. शिधापत्रिका पिवळी, केशरी असो की पांढरी. राज्यातील साडेअकरा कोटी नागरिकांचा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करून घेतला आहे. अशा सर्व रुग्णांवरील उपचाराचा खर्च या योजनेतून करण्यात येत आहे. राज्य सरकार प्रत्येक व्यक्‍तीमागे अठराशे रुपये विमा कंपनीला देते. जेणेकरून नागरिकांना ही सेवा उपलब्ध होऊ शकेल, असे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना : 
उद्देश : कोरोनासह गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालयांमधून मोफत आरोग्य सुविधा देणे अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.jeevandayee.gov.in 

एकूण लाभार्थी संख्या - 5 हजार 327 

पुणे महापालिका क्षेत्र : 2 हजार 609 
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र: 2 हजार 31 
ग्रामीण क्षेत्र : 687 

या योजनेंतर्गत रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णांकडून पैसे घेऊ नये. पैसे घेतल्यास पाचपट दंड आकारण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्याही व्यक्‍तीची तक्रार आल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्या रुग्णालयास या योजनेच्या यादीतून काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- राजेश टोपे, आरोग्य मंत्री 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्णांची आर्थिक पिळवणूक होवू नये, याबाबत रुग्णालयांनी खबरदारी घ्यावी. काही रुग्णालयांनी जास्त रुग्णांना लाभ दिला आहे, ही समाधानकारक बाब आहे. परंतु काही रुग्णालये रुग्णांना अपेक्षित लाभ देण्यात कमी पडले आहेत. अशा रुग्णालयांनी संवेदनशीलतेने कोरोना बाधित रुग्णांना मदत करावी. 
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan controversy: "भाजपाला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता..."; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले पुरावे, राज्यात खळबळ!

पुण्यात भाजपचा राडा, आंदोलकांची दगडफेक; महिला जखमी, पोलीस सामिल असल्याचा काँग्रेसचा आरोप

Mumbai: मोदी-मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क; १३ तास वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर प्रवेशबंदी

Viral Video : फुटपाथवर स्कूटरस्वाराला धडा शिकवणाऱ्या वृद्ध महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पण यावेळी... पाहून तुम्हीही कौतुक कराल

अजून शेवट बाकी ! असा प्रसारित होणार पारूचा अखेरचा एपिसोड; महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT