पुणे

आंबेगाव तालुक्यात २१४ अर्ज प्रलंबित

CD

मंचर, ता. ५ : आंबेगाव तहसील कार्यालयामार्फत चालू आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ जुलै २०२६) एकूण दोन हजार ८३२ जात प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. ३१ जुलैअखेर २१४ अर्ज प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणे २० जुलै ते ३१ जुलैदरम्यान प्राप्त झालेली असून केवळ १० ते ११ दिवसांची असल्याची माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

जात प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना विलंब होत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असल्या तरी तहसील कार्यालयाच्या आकडेवारीनुसार दीर्घकाळ प्रलंबित असलेली कोणतीही प्रकरणे नाहीत. अर्ज परिपूर्ण असल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करून अंतिम मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो.
तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील अधूनमधून होणाऱ्या सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे सेतू व महा-ई-सेवा केंद्रांवरून अर्ज वेळेत ऑनलाइन सादर करण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही अर्ज प्रणालीमध्ये नोंदवण्यास विलंब होतो.
प्रमाणपत्र नाकारण्याबाबत किंवा अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्यामागेही स्पष्ट नियम असल्याचे प्रशासनाने सांगितले. मान्य दिनांकापूर्वीच्या आवश्यक महसुली अथवा शैक्षणिक नोंदी उपलब्ध नसणे, सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये वंशावळीत किंवा रक्ताच्या नातेसंबंधांच्या पुराव्यांमध्ये विसंगती आढळल्यास अतिरिक्त पुरावे मागविले जातात. नियमांनुसार आवश्यक सर्व कागदपत्रे सादर झाल्यास अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाते.

तहसील कार्यालयाने नियमबाह्य पद्धतीने प्रमाणपत्र मिळवण्याच्या कोणत्याही प्रकाराला प्रोत्साहन दिले जात नसल्याचे स्पष्ट केले असून, सर्व अर्जांची पडताळणी शासनाच्या नियमानुसारच केली जाते, अशी माहिती नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.


आकडेवारी :
कालावधी : १ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६
वितरित जात प्रमाणपत्रे : २,८३२
प्रलंबित अर्ज : २१४
प्रलंबित कालावधी : २० जुलै ते ३१ जुलै २०२६ (१० ते ११ दिवस)

जात प्रमाणपत्रासाठी प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाची शासनाच्या नियमांनुसार पडताळणी केली जाते. अर्ज परिपूर्ण असल्यास कोणताही अनावश्यक विलंब न करता तो मंजूर करून पुढील अंतिम मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविला जातो. काही प्रकरणांमध्ये आवश्यक पुरावे अपूर्ण असल्यामुळे अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करावी लागते.
- राहुल सारंग, तहसीलदार


अर्जदारांकडून सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व्हर डाऊन किंवा तांत्रिक अडचणींमुळे अर्ज अपलोड करण्यास विलंब होतो. ही समस्या दूर झाल्यास नागरिकांना अधिक जलद सेवा देता येईल.
- विशाल ज्ञानेश्वर भांगे, महा-ई-सेवा केंद्र चालक, मंचर

जात प्रमाणपत्र वेळेत मिळणे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि विविध योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अर्जाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.
- अनुराग नितीन गायकवाड, विद्यार्थी, चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT