1dabholkar_gauri_0.jpg
1dabholkar_gauri_0.jpg 
पुणे

राजेश बंगेरानेच दिले अंदुरे, कळसकरला शस्त्रप्रशिक्षण 

प्रियांका तुपे

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्रप्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व डिगवेकरला अटक केली. शनिवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दोघांना सचिन अंदुरेसह हजर केले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी बंगेरा व डिगवेकरला 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली; तर सचिन अंदुरेला न्यायालयीन कोठडी सुनावली. 

राजेश बंगेरा व अमित डिगवेकर हे दोघे गौरी लंकेश हत्याप्रकरणातील आरोपी आहेत. दाभोलकर यांचा संशयित मारेकरी सचिन अंदुरेच्या चौकशीतून राजेश बंगेराबाबत धागेदोरे सापडले. बंगेराने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी अंदुरे व कळसकरला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले, त्याबाबत पैसा कोणी पुरवला, नियोजन कोणी केले, याचा तपास करायचा आहे; तसेच अमित डिगवेकर कटातील एक मुख्य सूत्रधार असून, त्याने दाभोलकर यांचे घर, मॉर्निंग वॉकला जाण्याची वेळ, ठिकाण आदी बाबींची माहिती मारेकऱ्यांना पुरवली, असा दावा सीबीआयने केला. सीबीआयचे वकील ऍड. विजयकुमार ढाकणे यांनी याबाबतच्या सखोल तपासासाठी 14 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती, त्याला विरोध करताना बंगेरा व डिगवेकरचे वकील ऍड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद करताना "सीबीआय याआधी सारंग अकोलकर व विनय पवार हेच मुख्य मारेकरी आहेत, असा दावा करत होती, आता नवीन थिअरी सीबीआय मांडत आहे; तसेच दाभोलकर प्रकरणाच्या तपासाबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याने सीबीआयने ही कारवाई केली आहे,' असे न्यायालयाला सांगितले. 

डिगवेकर 15 वर्षांपासून गोव्यात 
दाभोलकर हत्याप्रकरणात अमित डिगवेकरची भूमिका सूत्रधाराची असून, तो मागील 15 वर्षांपासून गोव्यातील फोंडा येथे सनातन संस्थेच्या आश्रमात राहत होता; तर राजेश बंगेरा कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या आमदाराचा खासगी सहायक (पीए) होता, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली. 

कर्नाटक एसआयटी तिघांना घेणार ताब्यात 
औरंगाबाद : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरेचे मेहुणे शुभम सुरळे, अजिंक्‍य सुरळे यांच्यासह त्यांचा मित्र रोहित रेगे अटकेत आहे. त्यांना कर्नाटक विशेष पथकाकडून (एसआयटी) ताब्यात घेण्यात येणार असल्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरेचे मेहुणे शुभम व अजिंक्‍य सुरळे यांच्या ताब्यातून पिस्तुलासह तलवार आणि कुकरी चाकू, एअर गन जप्त करण्यात आली होती. सचिन अंदुरे याला एटीएसने उचलल्यानंतर त्याने सासरी ठेवलेले पिस्तूल एटीएसच्या हाती लागले. हे शस्त्र शुभम व अजिंक्‍य सुरळेने रेगेकडे लपविले होते. गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येतही या हत्यारांचा वापर व तिघांचा कटातील सहभाग तपासण्यासाठी औरंगाबाद न्यायालयाकडे कर्नाटक एटीएस अर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रेगेकडून जप्त केलेल्या पिस्तूल तांत्रिक अहवालासाठी न्याय वैद्यकीय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा अहवाल तातडीने मिळावा यासाठी एसआयटीने पत्रव्यवहारही केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT